Dr Ramchandra Sable Andaj पुणे येथील कृषी हवामानशास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रातील पावसाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते १६ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ आणि मराठवाड्यासह सर्व विभागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाच्या बदलत्या स्थितीबाबत अंदाज
१५ ऑगस्ट रोजी राज्यातील हवेचा दाब १००४ ते १००६ हेक्टोपास्कलपर्यंत राहणार आहे. पण १६ ऑगस्टला तो १००२ ते १००४ हेक्टोपास्कलपर्यंत खाली येईल, ज्यामुळे पावसाची सुरुवात होणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण: नाशिक आणि जळगावमध्ये ५ ते १२ मि.मी. हलका पाऊस होईल. तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत २ ते ६ मि.मी. इतका अतिशय हलका पाऊस अपेक्षित आहे.
मराठवाड्यातील पावसाची शक्यता
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत १० ते २५ मि.मी. पावसाची नोंद होईल. नांदेडमध्ये ८ ते ४० मि.मी. पाऊस होण्याची शक्यता असून इतर जिल्ह्यांत ५ ते १५ मि.मी. हलका पाऊस पडू शकतो.
विदर्भात होणारा मुसळधार पाऊस
बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांत ४५ ते ९० मि.मी. पाऊस होईल. तर नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये ४२ ते ९० मि.मी. मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
भंडारा आणि गोंदियात ४५ ते ८० मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तर ७५ ते १३० मि.मी. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात किती पाऊस पडणार?: कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे ३ ते ३० मि.मी. पाऊस पडेल. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची नोंद होईल.
शेतकऱ्यांसाठी रामचंद्र साबळे यांचा महत्त्वाचा सल्ला
जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचल्यास ते तातडीने काढून टाकावे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शेतीचे नियोजन हवामान लक्षात घेऊन करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
दुष्काळग्रस्त भागांबाबतचा अंदाज
गेल्या ३० वर्षांच्या अभ्यासानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या भागांत ९ ते १० वेळा पाऊस पडतो. त्यामुळे पुढील दिवसांत पावसाचा चांगला दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.