Aaj Havaman Andaj राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मुसळधार पावसाची शक्यता असून या भागांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
Havaman Andaj Aajcha
मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र नांदेड जिल्ह्यासाठी परिस्थिती आणखी गंभीर असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक व जळगाव जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यातील या हवामान बदलामुळे पिकांवर आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे.
Disclaimer: या लेखातील माहिती भारतीय हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजावर आधारित आहे. हवामानातील बदल अचानक होऊ शकतात. यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असू शकते. वाचकांनी नेहमी स्थानिक प्रशासन व अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.