Royal Enfield EV ने अखेर इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले पाऊल टाकले आहे. कंपनीने नुकताच हिमालयन इलेक्ट्रिकचा अधिकृत टीझर प्रदर्शित केला आहे. या मॉडेलचं उत्पादन 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक हिमालयन ही कंपनीच्या लोकप्रिय हिमालयन 450 वर आधारित असून त्याचं डिझाइन रग्ड लुकसह तयार करण्यात आलं आहे.
आकर्षक डिझाइन आणि अॅडव्हेंचर रेडी लुक
हिमालयन इलेक्ट्रिकमध्ये गोल एलईडी हेडलाईट, उंच विंडस्क्रीन आणि सिंगल पीस सीट दिली आहे. या बाईकमध्ये वायर स्पोक व्हील्ससह ऑफ-रोड टायर्स देण्यात आले आहेत, जे डोंगराळ आणि खडबडीत रस्त्यांवर सहज धावण्यासाठी उपयुक्त ठरतील. रॉयल एनफिल्डने यापूर्वी 2023 आणि 2024 च्या आंतरराष्ट्रीय मोटारसायकल शोमध्ये या बाईकचे कॉन्सेप्ट मॉडेल दाखवले होते.
लडाखमधील कठीण टेस्टिंग
कंपनीने हिमालयन इलेक्ट्रिकसोबत हिमालयन 750 चा टीझरही सादर केला आहे. दोन्ही बाईक्सची टेस्टिंग जगातील सर्वात उंच रस्त्यांपैकी एक असलेल्या लडाखमधील खारदुंगला खिंडीत करण्यात आली. ही कठीण चाचणी इलेक्ट्रिक हिमालयनच्या दमदार क्षमतेचं प्रतिक मानली जाते.
बॅटरी आणि मोटर तंत्रज्ञान
सध्या या बाईकमध्ये कोणती बॅटरी आणि मोटर वापरली जाणार आहे याची अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाही. मात्र, उपलब्ध माहितीनुसार बॅटरी ही बाईकच्या फ्रेमचा भाग असेल. त्यामुळे बाईकची ताकद, संतुलन आणि राइडिंगचा अनुभव अधिक चांगला होईल. ही रचना भविष्यातील इलेक्ट्रिक अॅडव्हेंचर बाईक्ससाठी पाया घालणारी ठरणार आहे.
फ्रेम्स आणि सस्पेन्शन तंत्रज्ञान
हिमालयन इलेक्ट्रिकचे बॉडी पॅनेल फ्लेक्स फायबर कंपोझिट मटेरियलने तयार करण्यात आले आहेत, जे टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल आहेत. या बाईकमध्ये उलटे फ्रंट फोर्क्स आणि इलेक्ट्रॉनिकरीत्या समायोज्य रियर मोनोशॉक सस्पेंशन मिळू शकते. यामुळे कठीण रस्त्यांवरसुद्धा ही बाईक स्थिर आणि आरामदायक चालेल.
स्मार्ट फीचर्स आणि कनेक्टिव्हिटी
या इलेक्ट्रिक अॅडव्हेंचर बाईकमध्ये आधुनिक टीएफटी डिस्प्ले, कनेक्टेड नेव्हिगेशन आणि वेगवेगळे राइडिंग मोड उपलब्ध असतील, अशी अपेक्षा आहे. हे फिचर्स रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीमपासून प्रेरित असतील.
अपेक्षित किंमत आणि लाँचिंग
रॉयल एनफिल्ड हिमालयन इलेक्ट्रिकची किंमत 7 ते 8 लाख रुपयांच्या दरम्यान (एक्स-शोरूम) असू शकते. या बाईकचं उत्पादन मॉडेल 2026 च्या शेवटी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही बाईक भारतातील इलेक्ट्रिक अॅडव्हेंचर मोटरसायकल सेगमेंटला नवा आयाम देईल.