Aajcha Hawaman Andaj दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि या भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. चला पाहूया, 12 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 12 ऑगस्ट रोजी सामान्यतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस गडगडाटासह होऊ शकतो. मुंबईत या दिवशी कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर सोडता, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
पुणे शहरात देखील सामान्यतः ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून सांगली आणि सोलापूरमध्ये अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
Disclaimer: ही माहिती हवामान विभागाकडून उपलब्ध झालेल्या स्रोतांवर आधारित आहे. हवामान परिस्थिती वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळी असू शकते. अधिकृत माहिती आणि अपडेटसाठी स्थानिक हवामान केंद्राशी संपर्क साधावा. लेखन केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे.