Annapurna Yojana महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कमी करणे आणि त्यांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लावणे हा उद्देश ठेवून एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असून पात्र महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
योजनेचा उद्देश
ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना धुरकट चुलीपासून होणाऱ्या आरोग्याच्या समस्या कमी करणे आणि कुटुंबाचा आर्थिक भार हलका करणे हे या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही लागू होणार आहे.
सध्याची अंमलबजावणी: या योजनेचा पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी १५४० महिलांची यादी तयार झाली असून लवकरच त्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप होणार आहे. पुढील काळात ही योजना संपूर्ण राज्यात विस्तारली जाईल.
पात्रता निकष
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी. अर्ज करताना तिचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पाच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. गॅस कनेक्शन महिलेच्या स्वतःच्या नावावर असावे. तसेच बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी जोडलेले असावे. मात्र सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
आवश्यक कागदपत्रे: या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, गॅस कनेक्शन पासबुक, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक राहतील.
अर्ज प्रक्रिया
सध्या या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन अथवा ऑफलाइन कसा करावा याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. तरी इच्छुक महिलांनी आपल्या स्थानिक जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी.
योजनेचा फायदा
या योजनेमुळे महिलांच्या आरोग्यावरील धोके कमी होण्यास मदत होईल. तसेच मोफत गॅस सिलेंडरमुळे घरखर्चात मोठी बचत होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्याकडे हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
Disclaimer: ही माहिती सार्वजनिक माध्यमांवर आधारित असून केवळ माहितीपुरती दिली आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत शासकीय संकेतस्थळ किंवा संबंधित विभागाकडून खात्री करून घ्यावी.