Bank Holiday ऑगस्ट महिना सुरू होताच सण-समारंभाचा हंगामही सुरू झाला आहे. संपूर्ण महिन्यात जवळपास प्रत्येक आठवड्यात एकापेक्षा जास्त सुट्ट्या आल्या आहेत. याच आठवड्यातही सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा बँक बंद असल्याने कामात अडथळा येऊ शकतो.
१५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवस बँक
१५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवसांत बँकांचे व्यवहार थांबणार आहेत. यामध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी तर १७ ऑगस्टला रविवारची सुट्टी आहे. या तिन्ही दिवशी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण १५ दिवस बँका विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत.
बँका बंद असताना उपलब्ध सेवा
बँका बंद असल्या तरी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा सुरूच राहतील. रोख रक्कमेची गरज भासल्यास एटीएमद्वारे पैसे काढता येतील. मात्र, चेक क्लीयरिंग किंवा प्रॉमिसरी नोट्ससारख्या व्यवहारांना या दिवसांत प्रोसेसिंग मिळणार नाही.
आरबीआय आणि राज्य सरकार राष्ट्रीय सुट्ट्या, स्थानिक उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक प्रसंग विचारात घेऊन बँकांसाठी सुट्ट्यांची यादी निश्चित करतात. याची अधिकृत घोषणा आरबीआयच्या संकेतस्थळावर आणि अधिसूचनेद्वारे बँका व वित्तीय संस्थांना कळवली जाते.
ऑगस्टमध्ये अजून काही सुट्ट्या येणार असल्याने ग्राहकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन वेळेवर करणे गरजेचे आहे, अन्यथा कामात विलंब होऊ शकतो.
Disclaimer: या लेखातील माहिती आरबीआय आणि संबंधित बँकांच्या अधिकृत घोषणांवर आधारित आहे. सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांनी नेहमी ताज्या माहितीसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधावा.