Goat Framing Scheme ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी रोजगाराचे नवे दार खुले झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या शेळीपालन कर्ज योजना 2025 अंतर्गत आता इच्छुकांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे आणि युवकांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
शेळीपालन कर्ज योजना काय आहे?
ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी व तरुणांसाठी मोठा आधार आहे. याअंतर्गत शासकीय व खासगी बँका 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहेत. ही रक्कम शेळ्या खरेदी, गोठा बांधणे, चारा, औषधे तसेच व्यवसायाशी संबंधित सर्व खर्चासाठी वापरता येते. भांडवलाअभावी व्यवसाय सुरू करता न येणाऱ्या तरुणांसाठी ही योजना मोठा हातभार ठरणार आहे.
पात्रता आणि कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याचे वय किमान 18 वर्षे असावे. अर्जदाराचा सिव्हिल स्कोअर चांगला असावा आणि तो कोणत्याही थकीत कर्जात नसावा. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्न व निवास प्रमाणपत्र, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल आणि मोबाईल क्रमांक अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कर्जाची रक्कम आणि परतफेड
या योजनेत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. वेळेवर परतफेड केल्यास पुढील टप्प्यात 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची संधी मिळते. बँक व कर्ज रकमेप्रमाणे व्याजदर साधारण 7 ते 12 टक्के असतो. परतफेडीसाठी ईएमआयची सोय उपलब्ध असून त्यामुळे कर्जदाराला व्यवसायात ताण येत नाही.
Disclaimer: वरील माहिती ही शैक्षणिक आणि जनजागृतीसाठी आहे. कर्जाच्या अटी, व्याजदर आणि प्रक्रिया बँकेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित बँक किंवा अधिकृत सरकारी संकेतस्थळावरून अद्ययावत माहिती घ्यावी.