Havaman Andaj Aajcha राज्यात आजपासून पावसाची नवी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही तासांत काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेला सविस्तर अंदाज असा आहे.
मराठवाडा: जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
विदर्भ: अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून येथे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा आहे. वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज तर नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य व उत्तर महाराष्ट्र: नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकण: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता कायम आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.