Ladki Bahin August महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून आता महिला ऑगस्टच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, ऑगस्टचे पैसे सर्वांना मिळणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणार असली तरी अनेक लाभार्थी महिला या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ
लाडकी बहीण योजनेचा लाभ आजवर तब्बल अडीच कोटी महिलांनी घेतला आहे. पण यामध्ये जवळपास ४२ लाख अर्ज बाद करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. यातील तब्बल २६ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, अशी माहिती स्वयंपूर्ण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. अजूनही मोठ्या प्रमाणावर अर्जांची तपासणी सुरु असून अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी आश्चर्यकारक बाबीही समोर आल्या आहेत. अगदी ९८ वर्षांच्या आजीबाईंनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती उघड झाली आहे. त्यांनी वर्षभरात तब्बल १८ हजार रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रशासन अधिक सजग झाले असून आता काटेकोर तपासणी केली जात आहे.
लाडकी बहीण योजनेतून महिलांना अपात्र ठरवण्याची कारणे
लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी शासनाने ठरवलेले नियम स्पष्ट आहेत. यानुसार, लाभ घेणाऱ्या महिलांचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. तसेच, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
योजनेच्या निकषांनुसार, लाभार्थी महिला आणि त्यांचे कुटुंबीय करदाते नसावेत. त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे आणि लाभार्थी महिला सरकारी नोकरीत नसावी. या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज आपोआप बाद करण्यात येतात.
सध्या अंगणवाडी सेविका गावोगावी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत. पडताळणीदरम्यान ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचा हप्ता थांबवला जाणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Disclaimer: ही माहिती विविध वृत्त आणि शासकीय स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत शासकीय संकेतस्थळ व अधिकृत घोषणांची खात्री करूनच कृती करावी.