New Expressway 2025 महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे हे दोन प्रमुख शहर असून, दररोज लाखो प्रवासी या दोन शहरांदरम्यान प्रवास करतात. औद्योगिक, कृषी आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने मुंबई-पुणे दळणवळण सुधारण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई आणि पुणे दरम्यान एक नवीन द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. या नवीन तिसऱ्या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याचा अपेक्षित परिणाम आहे.
तिसऱ्या द्रुतगती महामार्गाचे स्वरूप
सध्या मुंबई-पुणे-बेंगलोर दरम्यान ८३० किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग प्रकल्प चालू असून, त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मुंबई- पुणे दरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग अटल सेतू पासून सुरू होऊन पुणे रिंग रोडला जोडला जाणार आहे आणि पुढे पुणे-बेंगलोर द्रुतगती महामार्गाशी जोडला जाईल.
या मार्गाचा एकूण लांबी
या मार्गाचा एकूण लांबी सुमारे १३० किलोमीटर असेल. त्यातील ३० किलोमीटरचा आराखडा पूर्ण झाला असून उर्वरित १०० किलोमीटरसाठी व्यवहार्यता अभ्यास आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दावा आहे की हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते पुणेचा प्रवास फक्त दीड तासांत होईल. सध्या चालू असलेल्या महामार्गावर सुमारे अडीच तास लागतात, पण वाहनांच्या संख्येमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते.
महत्त्वाचे मुद्दे व फायदे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाचा विस्तार दहा पदरी करण्याचा निर्णय घेतला असून, मिसिंग लिंकचे काम सुरू आहे. मात्र भविष्यात वाढत्या वाहन संख्येमुळे हा महामार्गदेखील अपुरा ठरू शकतो. म्हणून पुणे ते बेंगलोर द्रुतगती महामार्गाचा विस्तार मुंबईपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या १३० किलोमीटरच्या महामार्गात पागोटे ते चौक (३० किलोमीटर) आणि चौक ते पुणे रिंग रोड (१०० किलोमीटर) असे दोन टप्पे असतील. या महामार्गाला अटल सेतू आणि जेएनपीटीसुद्धा जोडले जाणार आहे. भूसंपादनासाठी २९ गावांमध्ये प्रक्रिया सुरू असून, ९०% संपादन झाल्यानंतर निविदा काढल्या जाणार आहेत.
Disclaimer: ही माहिती सध्याच्या सरकारी अहवाल आणि अधिकृत घोषणांवर आधारित आहे. भविष्यात बदल होण्याची शक्यता असते. अधिकृत निर्णयासाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क करावा.