Panjabrao Dakh Andaj महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी 14 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या कालावधीत पावसाचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या मते, पुढील दोन आठवड्यांत राज्याच्या बहुतेक भागांत पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाब डख
14, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. यानंतर 17, 18 आणि 19 ऑगस्ट दरम्यानही पावसाची तीव्रता कायम राहील. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खान्देश अशा सर्व भागांमध्ये हा पाऊस बरसणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही पावसाची चांगली नोंद होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
पावसासोबत विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना झाडाखाली थांबू नये आणि जनावरांनाही झाडाखाली बांधू नये, असा इशारा देण्यात आला आहे. ज्या भागात आत्तापर्यंत कमी पाऊस झाला आहे, तिथेही आता चांगल्या पावसाची शक्यता आहे.
21 ऑगस्ट पासून 22, 23 आणि 24 ऑगस्ट
21 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरुच राहील. त्यानंतर 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी काही भागांत सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. मात्र, 26 ते 29 ऑगस्ट या कालावधीत पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊन अनेक भागांत पावसाची पुनरागमनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण, पाणी साठवण आणि विजांच्या धोक्यापासून बचावासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.
डिस्क्लेमर: हा हवामान अंदाज पंजाब डख यांच्या माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होऊ शकतात, त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती भिन्न असू शकते. वाचकांनी स्थानिक हवामान खात्याच्या सूचनांचा अवलंब करावा.